नेमळे येथे ग्रामसचिवालय उभारणार…

खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन;

⚡सावंतवाडी ता.०८-: तालुक्यातील नेमळे ग्रामसचिवाला सचिवालय अद्यावत करण्याचा शब्द आपण देत असून ग्रामस्थांना न्याय मिळावा विकास व्हावा यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे सचिवालय असणे आवश्यक आहे आगामी टर्म मध्ये नेमळे ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक अशी उभारू लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमीच सोबत विकासासाठी ग्रामस्थांसोबत असल्याचा विश्वास सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला

ते नेमळे कुंभारवाडी रस्त्याचे खडीकरण,डांबरीकरण व संरक्षण भिंतीचे भूमिपूजन कार्यक्रमानंतर नेमळे ग्रामपंचायतच्या कार्यालयात बोलत होते खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते कुदळ मारून व नेमळे गावच्या सरपंचा सौ. दीपिका भैरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या खडीकरण व डांबरीकरणासाठी सतरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या कार्यक्रमानंतर खासदार राऊत, व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी नेमळे ग्रामपंचायतीला भेट दिली.

यावेळी सरपंच सौ दीपिका भैरे व उपसरपंच सखाराम राऊळ यांनी ग्रामपंचायत च्या वतीने खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खासदार राऊत यांच्या माध्यमातून नेमले गावामध्ये पंधरा कोटी होऊन अधिक रकमेची विकास कामे झालेली असून या गावाच्या विकासाबरोबर तळवडे जिल्हापरिषद व आसपासच्या भागाच्याही विकासासाठी खासदार राऊत यांनी प्राधान्य दिल्याबद्दल त्यांच्याप्रति कृतज्ञता तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केली

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शब्बीर मणियार, बाळू माळकर,अशोक राऊळ, महिला तालुका संघटक भारती कासार, रमेश गावकर उपसरपंच सखाराम राऊळ,शाखा प्रमुख सचिन मुळीक,ग्रा.सदस्य स्नेहाली राऊळ, शितल नानोस्कर, सागर नेमळेकर, एकनाथ राऊळ, सिद्धेश नेमळेकर, आरती राऊळ, संजना नेमळेकर, महादेव नाईक, विनोद राऊळ, गुंडू पांगम,आबा सावंत आत्माराम राऊळ, पुरूषोत्तम राऊळ,गुणाजी गावडे आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page