सेतू सुविधा केंद्रांचा सर्व्हर डाऊन…

शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल:कणकवली तहसीलदार कार्यालय येथे नागरिक व विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी मोठी गर्दी..

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सेतु सुविधा कार्यालयांमधील महाऑनलाईनचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रतिज्ञापत्र व विविध प्रकारचे दाखले अपलोडींग करण्याचे काम ठप्प झाले आहे. महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवेशासाठी विविध प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहेत. त्यामुळे नॉनक्रिमीलेअर, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात पडताळणी या दाखल्यांसाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक असल्याने सेतु सुविधा केंद्रांबाहेर विद्यार्थी, पालक व सर्वसामान्य नागरिकांची मोठी होत आहे. गेले काही दिवस महाऑनलाईनचा सर्व्हर डाऊन, विद्यार्थी , पालकांसह सर्वसामान्यांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने महाऑनलाईनचा सर्व्हर डाऊन होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रतिज्ञापत्राची प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन होत असल्यामुळे सेतु सुविधा बाहेर प्रतिज्ञापत्र करण्यासाठी चार चार दिवस सर्वसामान्य नागरिक तात्कळत बसत आहेत. सेतु सुविधा बाहेर लांबच लांब रांगामध्ये उभे राहून गोर गरिब नागरिकांना सेवा मिळत नसल्यामुळे मानसिक त्रास होताना दिसत आहे.

गेल्या 2 दिवसापासून महाऑनलाईनवर दाखले अपलोड होत नसल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जर महाऑनलाईनची सर्व्हर डाऊन होत असलेली परिस्थिती अशीच राहिल्यास अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. या महाऑनलाईनच्या सर्व्हर डाऊनचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्या त्या तहसिल कार्यालयातील तहसिलदारांना व संबंधित प्रभारी अधिका-यांना बसत आहे. संतापलेले पालक व नागरिक थेट संबंधित अधिका-यांना जाऊन विचारणा करत आहेत. गेल्या 15 दिवसांत अनेकदा या प्रतिज्ञापत्राच्या तक्रारी लिहून शेकडो नागरिक या अधिका-यांकडे जातात. अनेकदा वादही होतात मात्र, सर्व्हर डाऊनचा प्रश्न महाऑनलाईनच्या सर्व्हरशी निगडीत असल्याने परिस्थिती जैसे थे आहे. जिल्ह्यात शालेय दाखल्यांसाठी आवश्यक असलेली शेकडो प्रतिज्ञापत्रे प्रलंबित राहिली आहेत. दोन तीन दिवस नागरिकांना पुन्हा पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी वेळ आणि पैसा खर्च करुन प्रतिज्ञापत्रासाठी फे-या माराव्या लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात चिड निर्माण झालेली आहे.

या परिस्थितीत सेवा देण्याच्या दृष्टीने कणकवली तहसिलदारांनी आपल्या स्तरावर प्रतिज्ञापत्र स्विकाराण्यासाठी विलंब झाला तरी संबंधित अधिकारी बसवले आहेत. प्रतिज्ञापत्राच्या प्रक्रियेसाठी 2 टेबलची व्यवस्था देखील केली. मात्र महाऑनलाईनच्या सर्व्हर डाऊनपुढे प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यातही अतिवृष्टीमुळे होणार विजेचा लपंडाव त्याचाही फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

महाविद्यालयीन प्रवेशाला दाखले सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी

महाऑनच्या सर्व्हर डाऊनमुळे जिल्ह्यातील सेतु सुविधा केंद्रांमध्ये प्रतिज्ञापत्रांसाठी व दाखल्यांसाठी शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी पालक धडपड करत आहेत. नॉनक्रिमीलेअर, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात पडताळणी या दाखल्यांसाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक असल्याने पुढील शैक्षणिक प्रवेश आपल्या मुलाचा होणार की नाही ? अशी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने महाविद्यालयीन प्रवेशासाठी सदर दाखले सादर करण्याची मुदत द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य पालकांमधुन केली जात आहे.

You cannot copy content of this page