मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली बांदा येथील आरटीओ चेक पोस्टला धडक…

अवैद्य प्रकारे होणारी वाहतूकीवर केली चर्चा:तात्काळ कारवाई करू; आरटीओ अधिकारी श्री भोसले यांनी दिला शब्द..

⚡सावंतवाडी ता.०९-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी इन्सुली येथे बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक देण्यात आली यात आरटीओ अधिकाऱ्यांशी मनसे शिष्टमंडळाने विविध विषयांवर चर्चा केली अवैद्य प्रकारे होणारी वाहतूक तसेच पासेस नसलेल्या ओवरलोड गाड्या ह्यामुळे शासनाचे होणारे नुकसान व बसेस मधून होणारी अवैद्य वाहतूक हे सर्व रोखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर तात्काळ कारवाई करू असे आश्वासन आरटीओ अधिकारी श्री भोसले यांनी दिले

आज सकाळी नियमित सर्व गाड्यांची तपासणी करून चुकीच्या रित्या होणाऱ्या वाहतुकीस दंडात्मक कारवाई करण्यात आली व यापुढे येथून होणाऱ्या वाहतुकीवर पूर्णता आमचे लक्ष असणार असे आश्वासन आरटीओ अधिकारी श्री भोसले यांनी मनसेच्या शिष्ट मंडळाला दिली तर यापुढे बांदा आरटीओ च्या इथून अवैद्य वाहतूक किंवा पासेस नसलेल्या ओव्हरलोड गाड्या आढळल्यास मनसे आरटीओ कार्यालय समोर आंदोलन छेडेल असा इशारा उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी मनसे विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक विजय जांभळे मा शाखा अध्यक्ष सुरेंद्र कोठावळे विद्यार्थीसेना जिल्हासचिव निलेश देसाई विद्यार्थीसेना शहराध्यक्ष स्वप्निल जाधव रघुनाथ खोटलेकर गिरगोल दिया विद्यार्थीसेना तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक रुपेश गुळेकर सुनील नाईक पंकज देसाई आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page