विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण..

अर्चना घारे परब वाढदिवसाच्या औचित्य:फाऊंडेशनचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.०८-: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थीनींसाठी खास स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात युनियन इंग्लिश स्कूल, आंबोली येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सावंतवाडी येथील “सिंधू सावलीन मार्शल आर्ट” चे श्री. दिनेश जाधव यांनी आपले सहकारी प्रतिक्षा गावडे यांच्यासह स्व-संरक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले याबद्दल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

तसेच बदलत्या काळानुसार मुलींनी स्वतःच्या रक्षणासाठी सदैव सक्षम व तत्पर असले पाहिजे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष विवेक गवस, आबा गावडे, मुख्याध्यापक व्ही. ए. मोरे, डि. पी. सावंत, बी.जे. गावडे, बी. ए. लवटे, बी. एस. बागुल, सौ. बी. बी. कांबळे व सर्व शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page