नेमळेत २५ हून अधिक कार्यकर्त्यांनी केला उबाठा शिवसेनेमध्ये प्रवेश…

⚡सावंतवाडी ता.०८-: नेमळे गावातील घारकरवाडीतील सर्व कुटुंबीयांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आज जाहीर प्रवेश केला खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते महिला जिल्हा संघटक जानवी सावंत जिल्हा समन्वयक बाळा गावडे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार सावंतवाडी तालुका संघटक भारती कासार माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर नेमळे शाखाप्रमुख सचिन मुळीक आबा केरकर युवा सेना तालुकाधिकारी गुणाजी गावडे उपतालुका संघटक रूपाली चव्हाण नमिता सावंत आदी उपस्थित होते.

शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल या भागातील रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवण्यात येईल अशी आश्वासन खासदार राऊत यांनी यावेळी बोलताना दिले दरम्यान लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी रस्त्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता घेतली जाईल आचारसंहिता संपल्यानंतर काम पूर्ण केले जाईल असे स्पष्ट केले
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दिलेला शब्द पाळते ज्या विश्वासाने कार्यकर्ते या पक्षाकडे येतात त्यांचा विश्वास जपण्याची काम हा पक्ष करत आला आहे असे यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले.

खा खासदार राऊत यांच्या हस्ते प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधण्यात आले यावेळी पल्लवी राऊळ समिधा राऊळ सचित्र राहुल श्वेता राऊळ संपदा राऊळ आदी 16 महिला भगिनींनी तर अशोक राऊंड वैभव राऊळ शिवाजी राऊळ या घारकरवाडीतील कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला

You cannot copy content of this page