श्री देव बांदेश्र्वर दीपोत्सव १३ रोजी

बांदा/प्रतिनिधी
श्री देव बांदेश्वर भूमिका पंचायतनचा भव्य दीपोत्सव कार्यक्रम बुधवार दिनांक १३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.


सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाट्न संपन्न होणार आहे. दिवे लावण्याची वेळ ही सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत आहे. दिव्यांसाठी लागणाऱ्या कापसाच्या वाती, तेल व पणत्या ह्या देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती मार्फत देण्यात येणार आहेत.
जास्तीत जास्त भाविकांनी श्री देव बांदेश्वर चरणी दिवे लावून दीपोत्सव कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन श्री देव बांदेश्वर स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीने अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page