ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रविण बांदेकर यांची पुस्तक प्रदर्शनास भेट…

⚡सावंतवाडी ता.०६-: येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक श्री. प्रविण बांदेकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. सौ. अर्चना घारे यांनी श्री. प्रविण बांदेकर यांचे स्वागत करत त्यांना पुस्तक प्रदर्शनाची माहिती दिली.

“सौ. अर्चना घारे यांनी आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून लोप पावत असलेल्या वाचन संस्कृतीला पुनरिज्जीवीत करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.” अशा शब्दांत श्री. प्रविण बांदेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

“लहानपणी शाळेत मला इंग्रजीचे धडे शिकवणाऱ्या बांदेकर सरांकडून मी आजही जीवनाचे अनेक बहुमोल पाठ शिकत असते. या पुस्तक प्रदर्शनास बांदेकर सरांच्या शुभेच्छा व आशीर्वाद लाभले हे मी माझे भाग्य समजते. आदरणीय बांदेकर सरांचे मनापासून आभार व यापुढेही त्यांचे मार्गदर्शन मला लाभावे ही सदिच्छा.” अशा भावना यावेळी सौ. अर्चना घारे यांनी व्यक्त केल्या.

You cannot copy content of this page