अखिल महाराष्ट्र कोल्लारी, डोंबारी संघटना व दिपक केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आयोजन
⚡सावंतवाडी ता.०६- : दिवाळी सणानिमित्त गड किल्ले प्रतिकृती बनवणे स्पर्धेचे आयोजन अखिल महाराष्ट्र कोल्लारी डोंबारी संघटनेच्या माध्यमातून व दिपक केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी राजन पोकळे, अशोक दळवी, निता कविटकर, सपना नाटेकर, परशुराम चलवाडी, गजानन नाटेकर, निलीमा चलवाडी, भारती परब, सिमा सोनटक्के, सचिन इंगळेआदी उपस्थित होते
सार्धेत एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- खुलागट-प्रथम वेताळ ग्रुप (जिमखाना), द्वितीय प्रसाद खोरागडे, तृतीय अमित होडावडेकर, उत्तेजनार्थ सुधीर चव्हाण, प्रेम पाटील, सोहन सावंत, बालगट (पहिली ते पाचवी)-प्रथम महादेव परब द्वितीय वेदांत परब, तृतीय तनया कुडतरकर, उत्तेजनार्थ दुर्वेश खोरागडे, बालगट (सहावी ते दहावी)-प्रथम रोनित पाटील, द्वितीय निरव लाखे, तृतीय स्वप्नील लाखे,उत्तेजनार्थ समिक्षा लाखे, हर्षल लाखे, शंतनु लाखे यांनी यश मिळविले. या कार्यक्रमात दुर्वेश खोरागडे या बालवाडीच्या विद्यार्थाचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेत सचिन पाटकर सर व अनिकेत आसोलकर यांनी पंच म्हणून काम पाहीले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव नरेश खोरागडे यांनी सूत्र संचालन सचिन पाटकर तर आभार मयुर लाखे यांनी मानले
.
