राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

⚡कणकवली ता.०६-: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली बौद्धविहार येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले .


यावेळी त्यांच्या सोबत कणकवली तालुका बौद्ध विकास संघ अध्यक्ष अंकुश कदम, कोषाध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष सुनील तांबे, माजी अध्यक्ष जी. डी. कदम,वसंत कदम, मोहन तांबे, राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे, प्रांतीक सदस्य विलास गावकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर,शहर सरचिटणीस गणेश चौगुले,जिल्हा सचिव सतीश पाताडे, तालुका उपाध्यक्ष सत्यविजय परब, खजिनदार राजू वरदम, तालुका सरचिटणीस किशोर गावकर, उदय सावंत, बाळू मेस्त्री आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page