⚡मालवण ता.०६-: नोव्हेंबर मध्ये घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत कट्टा येथील वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी नवनीत सोमनाथ परब याने मेरिट मध्ये येऊन घवघवीत यश मिळविले आहे.
या यशाबद्दल नवनीत परब याचे तसेच मार्गदर्शक शिक्षक, त्याचप्रमाणे मार्गदर्शन करणारे वडील डॉ. सोमनाथ परब यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
