कोळंब येथील गोपाळकृष्ण मंदिर येथे गवळदेव उत्सव आणि वर्धापन दिन ११ डिसेंबर रोजी…

⚡मालवण ता.०६-: मालवण शहरालगत असणाऱ्या कोळंब भटवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिर येथे गवळदेव उत्सव आणि मंदिराचा सहावा वर्धापन दिन सोहळा दि. ११ डिसेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे

प्रतिवर्षाप्रमाणे कोळंब भटवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिर येथे गवळदेव उत्सव आणि सहावा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने सकाळी ८.३० वा. मूर्ती पूजा व अभिषेक, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, ३ वा. ग्रामस्थांची गाऱ्हाणी, सायंकाळी ७ वा. भजने, रात्री ९.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम- रेकॉर्ड डान्स व एकांकिका आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपाळकृष्ण मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page