वाफोली मंदिर नजीक शौचालयाचे उद्घाटन…

⚡बांदा ता.०५-: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाफोली मंदिरनजिक बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत भोसले, गट विकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.

वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर नजिक शौचालय बांधण्यात आले आहे. यामुळे महिलांची तसेच आबालवृद्धांची होणारी गैरसोय टाळण्यात आली. वाफोली येथील श्री देवी माऊली देवस्थानच्या जत्रोत्सवाचे औचित्य साधुन शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विस्तार अधिकारी गजानन धरणे, समूह समन्वयक अविनाश सावंत, सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीचे एन. एल. सावंत, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब, सचिव राजाराम सावंत, सदस्य शिवराम परब, वाफोली देवस्थान समितीचे अध्यक्ष विलास गणपत गवस, सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, माजी सरपंच शिवाजी गवस, माजी सरपंच मारुती गवस, ग्रामपंचायत सदस्य मंथन गवस, सल्लागार विलास सावंत, सोसायटी चेअरमन सौ. धनश्री गवस, व्हा. चेअरमन अनिल गवस, वाफोली हितवर्धक संस्था मुंबईचे माजी अध्यक्ष राजेंद्र राणे, वामन रावजी गवस, अंकुश गवस आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लखमराजे यांनी श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले. अध्यक्ष विलास गवस यांनी श्री राजे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

You cannot copy content of this page