मळेवाड कोंडुरे येथे ११ उज्वला गॅस जोडणी…

गरजू महिलांना केले वाटप; उपसरपंच हेमंत मराठी यांचे सहकार्य..

बांदा/प्रतिनिधी
मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गावातील गरजू लाभार्थी महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू लाभार्थी महिलांना माफक दरात गॅस कनेक्शन मिळावे यासाठी उज्वला गॅस योजना सुरु केली.
या योजनेंअंतर्गत ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेकडून गावातील ११ गरजू लाभार्थी महिलांना उपसरपंच हेमंत मराठे यांच्या सहकार्याने उज्वला गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत. यापूर्वीही श्री मराठे यांच्या सहकार्याने गावातील १५ महिलांना उज्वला गॅस कनेक्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला होता. या वितरण प्रसंगी सरपंच सौ. मिनल पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी कुटुंबीय उपस्थित होते.

You cannot copy content of this page