संदेश सावंत:प्रांताधिकाऱ्यांजवळ मागणी..
⚡सावंतवाडी ता.०५-: पोलीस पाटील भरतीसाठी लागणारी कागदपत्रे बहुसंख्य उमेदवारांची तयार झाली नसल्याने ही अर्ज भरण्याची भरण्याची अंतीम तारीख ०६ डिसेंबर होती ती 7 दिवस मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदेश सावंत यांनी प्रांताधिकारी यांच्याजवळ केली आहे.
निवेदनात सावंत म्हणाले, तालुक्यातील काही गावात पोलीस पाटील पद रिक्त असल्याने त्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज भरणार आहेत त्यांना अर्ज भरण्याची अंतीम तारीख ०६ डिसेंबर देण्यात आली. या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे बहुसंख्य उमेदवारांची तयार झाली नसल्याने त्यांना या भरतीपासून मुकावे लागणार आहे ईएसडब्ल्यू सर्टिफिकेट, पोलीस पडताळणी सर्टिफिकेट , उत्पन्न दाखला यासारखी कागदपत्रे मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केले असून काहीना ती अजून मिळाली नाहीत. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस पाटील पदाच्या अर्ज भरण्याची अंतीम मुदत कमीत कमी ७ दिवस वाढवून मिळावी, अशी मागणी सावंत यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.
