*मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे सदस्य नोंदणी अभियानाची मुंबई येथून उद्या होणार सुरुवात

*तर मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते सिंधुदुर्गात अभियानास होणार सुरुवात; तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती

*💫कुडाळ दि.१३-:* मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्या दि.14 मार्च 2021 पासून मनसे सदस्य नोंदणी अभियान सुरू होत असून, या नोंदणी अभियानाचा शुभारंभ मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांचे हस्ते मुंबई येथे संपन्न होत आहे.

 त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा मनसे सदस्य नोंदणी अभियान सुरुवात पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचे उपस्थितीत कणकवली तेलीआळी येथील मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात होणार आहे. सदस्य नोंदणी प्रक्रिया ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार असून आगामी काळात तालुकास्तरावर   नोंदणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. मराठीहृदयसम्राट मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन,मराठी भाषा ,मराठी अस्मिता व मराठी बाणा जपत महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ध्यास उराशी बाळगणाऱ्या जिल्ह्यातील तरुण तरुणींनी अधिकृतरित्या पक्षाचा सदस्य म्हणून स्वतःची नोंदणी करून पक्ष संघटनेच्या माध्यमातून या क्रांतिरुपी नवनिर्माणाच्या लढाईत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page