*💫मालवण दि.१३-:* आदर्श गाव निवडी बाबत खास ग्रामसभेचे आयोजन आडवली- मालडी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच संदीप आडवलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी आदर्श गाव योजनेत समावेश होणे बाबत ठराव घेण्यात येऊन ग्राम विकास निधी उभारणे, पूर्ण वेळ ग्राम कार्यकर्ता निवड, सप्तसूत्री पालन करणे, तसेच आदर्श गावासाठी संजीवनी बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था इन्सुली या संस्थेची निवड करण्यात आली. मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसभापती सतीश परुळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सरपंच जिल्हा संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई, संजीवनी बहुउद्देशीय संस्थेचे रामभाऊ ठाकूर, संदीप पाटील, पाटे, उपसरपंच सौ सोनाली पराडकर, सामाजिक कार्यकर्ते अरुण लाड, ग्रामसेवक कृष्णाजी दळवी, पोलीस पाटील चंद्रदीपक मालंडकर, मंडळ अधिकारी पवार, कृषी पर्यवेक्षक श्री शेख, ग्रामपंचायत सदस्य सुनील कदम, स्वप्नील लाड, जोती लाड, दामिनी घाडीगांवकर, भक्ती साटम, विष्णू घाडीगांवकर, अरविंद साटम, विनोद साटम, विलास पराडकर, शैला कदम आदी उपस्थित होते.
आदर्श गावसाठी आडवली- मालडी येथे ग्रामसभा…!
