माड्याचीवाडी श्री सद्गुरु भक्त सेवा ध्यास येथे प्रतिसाद..

⚡बांदा ता.३०-: श्री स्वामी समर्थ मठ माड्याचीवाडी कुडाळ येथे श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या संस्थेच्या वतीने आयोजित ‘सुखी व निरोगी जीवनाचा गुरुमंत्र म्हणजे योग’ या विषयावर एकदिवसीय प्राणयोग कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

तज्ञ योगशिक्षक आनंद सावंत यांनी सूक्ष्म हालचाली, सुर्यनमस्कार, दंडस्थितीतील आसने, बैठक स्थितीतील आसने, शयन स्थितीतील आसने, विपरीत शयन स्थितीतील आसने, श्वसन प्रकार, प्राणायाम, शुध्दीक्रिया, ध्यानधारणा शास्त्रशुध्द पध्दतीने शिकविली. यासोबत फुप्फुसाची कार्यक्षमता वाढवीण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, थायराईड, मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी मनशांती करून एकाग्रता वाढविण्यासाठी  उपयुक्त अशा प्राणायामाचा शास्त्रशुध्द  सराव कशा पध्दतीने करावा याचे देखील मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत योग शिक्षक दिलीप सुतार, गिरीधर गावडे, शैलेश परब, प्रथमेश परब, सौ. केसर वानीवडेकर, अक्षता गडकरी हे योग शिक्षक व श्री श्री १०८ महंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय किनळेकर,  सचीव राकेश केसरकर, माधी गावडे आदी उपस्थित  होते.
 या कार्यशाळेत गावडे काका महाराज यांनी योगातून आपले शरीर निरोगी राहण्यासाठी प्राणायाम दररोज करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
You cannot copy content of this page