कोकणाचा हवा तसा अपेक्षित विकास गेला पंच्चवीस वर्षात झालाच नाही…

राहूल नार्वेकर; आताचे सरकार कोकणच्या विकासाला चालना देणारे..

⚡सावंतवाडी ता.२६-: कोकणचा हवा तसा अपेक्षित विकास गेल्या २५ वर्षात झालाच नाही, त्यामुळे आताचे सरकार कोकणच्या विकासाला चालना देत आहे, आगामी काळात त्याची फळ कोकणवासियांना येतील असा विश्वास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की सिंधुदुर्ग हा निसर्ग संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहेसध्या हा भाग पश्चिम घाटात मोडतो त्यामुळे इको सेन्सिटिव्ह एरिया या भागाला लागू आहे त्यामुळे प्रकल्प आणण्यात अडचणी येत आहेत त्याऐवजी पर्यटनाला चालणा देणे शक्य आहे, त्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे असेही नार्वेकर यावेळी बोलताना म्हणाले..

You cannot copy content of this page