मंत्री दीपक केसरकर:काही लोकांकडून काम होत नसल्याच्या आरोपाकडे आपण दुर्लक्ष करतो..
⚡सावंतवाडी ता.२५-: लोकांनी दिलेल्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी लवकरच गावागावात शेतकरी मेळावा, महिला बचत गटांचे मेळावे तसेच रोजगाराचे मिळावे घेऊन त्यांच्या हाताला कसं काम मिळेल यासाठी मी येणारा पुढील काळात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मात्र काही जणांकडून काहीच होत नसल्याचं आरोप करतात. परंतु मी त्यावर लक्ष न देता आपले काम करत राहणार असा टोला देखील त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
यावेळी मंत्री केसरकर पुढे बोलताना म्हणाले की आंबोली सावंतवाडी रोड हा गेल्यावर्षी बनवलेला होता. परंतु तो निष्कृष्ट दर्जाचा बनवल्याने तो पुन्हा नव्याने बनवण्यात येणार आहे असे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.दरम्यान प्रत्येक गावाला पाणीपुरवठ्याच्या योजना दिल्या असून ते देखील काम सुरू आहे. तसेच नदीकाठ गावावरच्या पाण्याची असलेले कमतरता देखील पूर्ण होईल असे केसरकर यांनी सांगितले.
