साटेली भेडशी येथे कात्याचा प्रकल्प लाईट साठी चार कोटीचा निधी उपलब्ध…

मंत्री दीपक केसरकर: नवनिर्वाचित उपसरपंच यांचा करण्यात आला सत्कार

⚡सावंतवाडी ता.२५-: येथील साटेली-भेडशी येथे कात्याचा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून त्या ठिकाणी लाईट साठी चार कोटीचा निधी एम एस सी बी ला आजच उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे तो प्रकल्प लवकरच सुरू होईल. यामुळे एक प्रकारे महिलांच्या हाताला रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान आपल्या गावची जी कामे असतील त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देईन अशीही ग्वाही यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.श्री. केसरकर यांच्या उपस्थितीत आज वेंगुर्ला व दोडामार्ग मधील नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केसरकर बोलत होते.

यावेळी श्री केसरकार पुढे बोलताना म्हणाले की आपल्या येणाऱ्या काळात चांगलं काम करून युतीचा धर्म पाळूनपुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना निवडून द्यायचे आहे. त्यासाठी आपण उत्तम प्रकारे काम करा असे आवाहन देखील श्री केसरकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. तसेच येणाऱ्या नौदल दिनानिमित्त पंतप्रधान हे आपल्या जिल्ह्यात येतात. यामुळे देखील आनंदाचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे, असे देखील श्री केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.

You cannot copy content of this page