भाई, आता थांबा, तुम्हाला आणखी किती संधी द्यायची? म्हणत आगामी विधानसभा उमेदवारीला विरोध..
दोडामार्ग,ता.१५-: आपण १५ वर्षे आमदार, २ वेळा मंत्री आणि ४ वेळा ४ पक्ष बदलून देखील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देऊ शकत नाही अजून किती संधी द्यावी तुम्हाला? असा सवाल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विचारणारे बॅनर सद्यस्थितीत दोडामार्ग मध्ये झळकत आहेत. यात तुम्ही वरती चढत गेलात आणि प्रत्येक वेळा नवीन- नवीन, काय-काय सांगलात ता आमका पटत गेला. हत्तीच्या वेळा तसा, पूर ईलो तेव्हा तसा, शेतीचा नुकसान झाला तेव्हाही तसा, असा कित्येकदा झाला भाई आता पुरे, आता थांबा असाही संदेश त्यावर लिहिण्यात आला आहे.
१५ वर्ष विकासापासून वंचित रखलेलो एक दोडामार्गवालो अशा नावाने हे बॅनर दोडामार्ग येथे झळकत आहेत. २ ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहे. यात भाई दोडामार्ग रुग्णालयातील आरोग्य सेवा रामभरोसे, कंत्राटी डॉक्टरांनी दिला राजीनामा, गेली दोन महिने महिला प्रसूची कक्ष बंद “बायकॉट दीपक भाई” अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी दीपक केसरकर यांनी आपण पुन्हा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. काही जण मी खासदारकी लढवणार असल्याचे सांगून आपली बदनामी करत आहेत. मात्र काही झाले तरी आपण पुन्हा एकदा ही निवडणूक लढणार, असा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर केसरकर विरोधकांकडून हे बॅनर लागल्याची चर्चा आहे
तर दुसऱ्या बॅनर मध्ये असे म्हटले आहे की, प्रिय दिपकभाई, दोन वेळचे नगरसेवक, येकदा नगराध्यक्ष, दोन वेळा आमदार, येकदा जिल्ह्याचे पालकमंत्री, चार येळा पक्ष बदलल्यात आणि आता तर शिक्षणमंत्री तुमी वरती चढत गेल्यात आणि प्रत्येक येळाक नयन – नयीन काय-काय सांगल्यात. आमका पटत गेला. हत्तींच्या येळाक तसा, पुर ईलो तेवा तसा, शेतीचा नुकसान झाला तेवाय तसा. असा कितकेंदा झाला. आता तर आमच्या दोडामार्गातली आरोग्य यवस्था सपल्यात जमा आसा. लोकांका साधो सर्दी-ताप इलो तरी गोयात जावचा लागता. हाल्लीच्या हाल्ली दोडामार्ग हास्पिटलातली बाळंतपणाय बंद झाली. दोन म्हयन्यात ५४ बाळंतपणा गोयात झाली. मागच्या १५ वर्षात जग खय गेला आणि आमी थयच रवलो. आता तुमका आजुनय येळ दिव व्हयो म्हणतेस, हेच्या पेक्षा अजून येगळा काय करत आहे……..
