⚡वेंगुर्ला ता.१५-: नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे वेंगुर्ला शहर मर्यादित अंगणवाडी व बालवाडीतील मुलांसाठी कै.सौ.शुभदा अविनाश शेणई स्मृतिप्रित्यर्थ घेतलेल्या समुहनृत्य स्पर्धत शिवाजी प्रागतिक कॅम्प-प्रथम, कुंभवडे सुंदरभाटले-द्वितीय, शेणई बालवाडी व वेंगुर्ला नं.३ अंगणवाडी -तृतीय यांनी यश मिळविले. स्पर्धेचे परिक्षण प्रा.महेश बोवलेकर, माया परब व विठ्ठल करंगुटकर यांनी केले. विजेत्यांना व अंगणवाडी ताईंना जानेवारीमध्ये गौरविण्यात येणार आहे.
फोटोओळी – अंगणवाडीच्या मुलांनी समुहनृत्य सादर केले.
समुहनृत्य स्पर्धेत शिवाजी प्रागतिक प्रथम…
