वायंगणी येथे ‘आनंदाचा शिधा‘चे वितरण…

⚡वेंगुर्ला ता.१२-: महाराष्ट्र सरकारने गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून १०० रूपयांमध्ये दिवाळीसाठी आवश्यक वस्तू शासनाच्या रास्त दराच्या धान्य दुकानावर दिल्या आहेत. वायंगणी-तळेकरवाडी येथील धान्य दुकानावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा‘ वितरीत करण्यात आला. यावेळी शामसुंदर मुणनकर, मिना मळकर, प्रताप करंगुटकर, यशोदा तांडेल, सुनिता केळुसकर, भागिरथी कुडव, विष्णू धोंड, सदानंद पेडणेकर, नाना कोळेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page