सावंतवाडी आयटीआयचे निवृत्त इन्स्ट्रक्टर दत्ताराम खानोलकर यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी आयटीआयचे निवृत्त इन्स्ट्रक्टर तथा मळगांव ब्राम्हणपाट येथील रहिवासी दत्ताराम राजाराम खानोलकर उर्फ दाजी रायकर यांचे शनिवारी मध्यरात्री २ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. मळगाव पंचक्रोशीत एक प्रगतशील शेतकरी म्हणून देखील ते प्रचलित होते.
अत्यंत मनमिळाऊ व दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात. गोरगरीब, अडल्या-नडल्यांना तसेच सर्वसामान्यांच्या मदतीला ते नेहमी धावून जात असत. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. क्रिकेटपटू दिनेश खानोलकर तसेच मळगांव रेडकरवाडी येथील नरेंद्र सृष्टी पर्यटन प्रकल्पाचे संचालक दिवाकर खानोलकर यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page