विरण विकास संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त भेट वस्तूचे वितरण…

⚡मालवण ता.११-: मालवण तालुक्यातील विरण विकास संस्थेच्या वतीने सभासदांना संस्थेचे नेतृत्व आणि माजी जि. प. वित्त व बाधकाम सभापती अनिल कांदळकर व सस्था अध्यक्ष रामदास बालकृष्ण पांजरी यांच्या हस्ते दिवाळी भेट वस्तूचे वितरण करण्यात आले.

या वेळी संस्था संचालक मोहन घाडिगावकर. जयेश नार्वेकर. रामचंद्र झोरे. रघुनाथ परब. यांच्या सह. माजी अध्यक्ष आबा घाडीगावकर. सुभाष परब. जितेंद्र परब व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या स्थापनेपासून तब्बल ७४वर्षे प्रथमच सभासदांना भेट वस्तु देण्यात आल्याने संस्था चालकांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे सचिव मोहन गावडे. लिपीक विजय घाडिगावकर. सुभाष परब यांनी संस्थेचे कामकाज उत्तम प्रकारे केल्या मुळे व संचालक मंडळाच्या नियोजनामुळे संस्था आर्थिक प्रगतीवर असल्यानेच या वर्षी दिवाळी भेट वस्तू देणे शक्य झाले असल्याचे अध्यक्ष रामदास पांजरी यांनी स्पष्ट केले. तर संस्थेच्या सभासदांनी संस्थेमार्फत कर्ज योजनेचा लाभ घेऊन मुदतीत कर्ज फेड केल्यास स्वत:बरोबर संस्थेचाही आर्थिक विकास होईल व पुढील काळातही अशाच प्रकारे सभासदांना डिव्हिडंड भेट वस्तू देण्याचा लाभ दिला जाईल असे आवाहन अनिल कांदळकर यांनी केले.

You cannot copy content of this page