भातशेतीचे मोठे नुकसान: अद्याप देखिल पावसाची रिपरिप सुरूच…
⚡कुडाळ ता.०८-: सिंधुदुर्गात काल मध्यरात्री पासून अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. आज सकाळी सुद्धा पावसाची रिपरिप सुरूच आहे. या अवकाळी पावसामुळे येणाऱ्या हंगामातील आंबा, काजू, जांभूळ पीक धोक्यात येऊ शकते. तर सिंधुदुर्गात अजूनही भातकापणी शिल्लक असून या अवकाळी पावसामुळे भातशेती आडवी होऊन नुकसान झालेय.
