कालावल हुरासवाडी येथील श्री महापुरुष मंदिराचा जिर्णोद्धार समारंभ संपन्न…

*💫मालवण दि.११-:* वायंगणी कालावल हुरासवाडी येथील श्री महापुरुष मंदिराचा जीर्णोद्धार उद्घाटन समारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तर शिवसेना उपनेते सुहास सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून करण्यात आला. त्याचप्रमाणे फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी हुरासवाडी विकास मंडळ कालावलच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना आचरा विभागप्रमुख उदय दुखंडे, विकास शिंदे, सरपंच संजना रेडकर, भाऊ परब, अनिल महाजन महेश सारंग भास्कर तोरसकर, संतोष सारंग, मनोहन हुन्नरे, ब्रम्हानंद टिकम, दिनेश साळकर, निलेश मांदरे, रामदास सारंग, लता रेवंडकर, सुहास आसोलकर, सुनील पराडकर, लक्ष्मण गुरव, शुभम रेवंडकर, संतोष सरमळकर, विकास हळदणकर, उमेश सारंग, मंदार पटवर्धन,विजय सारंग, मंगेश साळकर, ललीत गोलतकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page