⚡बांदा ता.०५-: बांदा गावची सुकन्या तथा अल्पवाधितच अभिनय क्षेत्रात ठसा उमटविणारी युवा अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिला झी मराठीच्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा स्त्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘तू चाल पुढे’ या मालिकेत ती मयुरीची व्यक्तीरेखा साकारात आहे.
छोट्या पडद्यावरील देवमाणूस – २ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेतील सोनूची तिची भूमिका गाजली होती. सुरुवातीला ‘शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील’ या वेबसिरीजमधून ती जगासमोर आली. त्यानंतर ‘व्हॅलेंटाईन डे आणि धोका’, ‘एक परदेसी मेरा’ अशा व्हिडीओ मध्ये ती दिसली. सध्या सुरु असलेल्या ‘तू चाल पुढ’ या मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. तिच्या उत्कृष्ट अभियानामुळे तिला उत्कृष्ट स्त्री व्यक्तीरेखेचा पुरस्कार मिळाला आहे. तिच्या यशाचे कौतुक होत आहे.
बांदा गावची सुकन्या झी मराठीच्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा स्त्री पुरस्काराने सन्मानित…
