दिव्यांग मुलींना आर्थिक मदत

⚡मालवण ता.०५-: राधारंग फाऊंडेशनचे डॉ. अशोक सरनाईक यांचे सहाध्यायी मालवण येथील डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते वायरी मारुती मंदिर येथील मानसी विकास लाड व माणगाव येथील निशा किशोर नलगे हिला प्रत्येकी २५०० रुपये आर्थिक मदत धनादेश स्वरुपात देण्यात आली.

सुविधा तिनईकर व डॉ. गौरी गणपत्ये यांच्या शिफारशीप्रमाणे डॉ. उर्मिला व डॉ. तन्मय लाल यांच्या देणगीतून राधारंग फाऊंडेशनतर्फे ही देणगी देण्यात आली. एक राधारंग फाऊंडेशन आणि अनिल / अनुराधा तिरोडकर सदाप्रेम या योजनेतून या दोन दिव्यांग मुलींना मदत देण्यात आली. या मदतीबद्दल संस्थेचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page