ग्रामस्थांचे वनविभागाला पाचारण:
शिताफीने मगरीला जेरबंद करून धामापूर तलावाच्या अधिवासात सोडले..
⚡मालवण ता.०५-: साळेल येथील काही युवक काल रात्री खेकडे पकडण्यासाठी साळेल वरचीवाडी येथील तळीचा ओहळ गणेश विसर्जन ठिकाणी गेले असता वहाळाच्या ओढ्यात त्यांना साधारण पाच फूट लांबीची मगर दिसून आली. युवकांनी या मगरीची माहिती गावातील इतर ग्रामस्थांना दिली. त्यानंतर वनविभागाचे श्री. कांबळे यांना बोलवून ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने मगरीला जेरबंद करून त्यांच्या ताब्यात दिली. रात्री उशीरा मगरीला धामापूर तलावाच्या अधिवासात सोडण्यात आले.
या मगरीला पकडण्यासाठी सरपंच रविंद्र साळकर, रोशन गावडे, प्रशांत मिठबावकर, प्रकाश घाडी, चिन्मय तावडे, आबा घाडी, मंगेश जामदार, नंदू गावडे, संजय गावडे, साबाजी गावडे, लवकेश साळकर, प्रमोद जामदार, प्रकाश गावडे, गणेश गावडे, बाबू घाडी, कमलेश साळकर, निलेश गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्त्यालगत असलेल्या गणेश विसर्जन होणाऱ्या तळीचा वहाळ येथे पाच फूटी भली मोठी मगर या वहाळाच्या पाण्यात आली कशी? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला. याबाबत गावात दिवसभर चर्चा सुरु होती.
