आचरावासियांचे आशीर्वाद हाच आमचा विजय…

मंगेश टेमकर :जनतेचे सेवक म्हणूनच काम करणार..

मालवण दि प्रतिनिधी

श्री देव रामेश्वरचे आशीर्वाद व जनतेचा पाठिंबा यावरच आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर व सर्व 13 सदस्य उमेदवार यांना प्रचार दरम्यान जनतेचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही विजयाची नांदी आहे. असा विश्वास ठाकरे गट व महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातआहे.

आचरा गावचा सर्वांगीण विकास हेच लक्ष राहणार आहे. सोबत रोजगार निर्मिती स्वयंरोजगार याला प्राधान्य देत रोजगार उपलब्द यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध विकास निधीतून आचरा गावात विकासाला प्राधान्य दिले जात आहे. सरपंच पदाचा अनुभव असलेले मंगेश टेमकर आचरा वासियांना अपेक्षित असलेले विकास धोरण, रोजगार निश्चितच पूर्ण करतील. गाव विकासाचे संकल्प, नव्या विकास योजना सतत यामागे राहून गावविकासाचा ध्यास असलेले मंगेश टेमकर यांना जनतेचे मिळत असलेले आशीर्वाद प्रतिसाद हाच आमचा विजयच आहे असे टेमकर यांनी सांगितले.

सरपंच उमेदवार मंगेश टेमकर म्हणाले, जनतेतून मिळणारा प्रतिसाद हाच आमच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. जनतेला जे अपेक्षित आहे ते पूर्ण करणे, गावातील सर्व वाडी वस्तीतील अधिकाधिक विकास कामाना प्राधान्य देणे हेच आमचे धोरण राहील. जनतेचे सेवक म्हणूनच आम्ही काम करू असेही मंगेश टेमकर यांनी सांगितले. आमचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमताने विजय होतील असा विश्वास मंगेश टेमकर व सर्व सदस्य उमेदवार यांनी प्रचारदरम्यान व्यक्त केला आहे.

सरपंच पदाचे उमेदवर मंगेश टेमकर यांसह सदस्य उमेदवार म्ह्णून प्रिया मेस्त्री, पूर्वा तारी, चंद्रशेखर मुणगेकर, अनुष्का गावकर, सुकन्या वाडेकर, सचिन बागवे, श्रद्धा सक्रू, अनिकेत मांजरेकर, युगंधरा मोरजे, सदानंद घाडी, चंदन पांगे, अमृता गांवकर, माणिक राणे आदी निवडणूक रिंगणात आहेत.

You cannot copy content of this page