गाजर दाखविणे हा भाजपचा जन्मसिद्ध हक्क…

ॲड.रेवती राणे ; केसरकरांच्या हायड्रोजन आणि बॅटरी निर्मितीचा पत्ताच नाही

⚡सावंतवाडी ता.३०-: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार आहे. तुमच्या मंत्र्यांच्या प्रयत्नाने आडाळीत दहा उद्योग येऊ शकतात, मात्र त्यासाठी जनतेमधील बेरोजगारीच्या प्रश्नांची माहिती असावी लागते. भारतीय जनता पक्षा सारखी फसवी आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच दिली नव्हती. गाजर दाखवणे हा भाजपाचा जन्मसिद्ध हक्क आहे. एकनाथ नाडकर्णी यांनी आधी गेल्या दहा वर्षात त्यांच्या नेत्यांनी आडाळी बाबत किती आश्वासने दिली याची आठवण करुन पहावी असा नेटवर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणें यांनी केला आहे.

दरम्यान आडाळी ग्रामस्थांनी लॉंग मार्च आंदोलन केल्यानंतर त्यांच्याच सरकारमधील मंत्री एक महिन्यात परदेशी कंपनीचा उद्योग सुरु करणार होते, हे तर अगदी ताज आश्वासन आहॆ, त्यामुळे नाडकर्णीना ते आठवत देखील असेल. काय झालं कुठं अडकला तो उद्योग? मंत्री केसरकर यांच्या आर्यन्स ग्रुपच्या 1500 कोटीच्या हायड्रोजन आणि बॅटरी निर्मिती उद्योगाचा आडाळीत पत्ताच नाही. साडेसात वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने आडाळी एमआयडीसीत किती उद्योग आणले ? किती आश्वासन दिली याची माहिती जनतेला आहॆ. असा टोला देखील सौ रेवती राणे यांनी यावेळी लगावला.

प्रसिद्धी पत्रकात असे नमूद करण्यात आले की महाविकास आघाडी शासनाच्या काळातच आडाळी एमआयडीसीतील पायाभूत सुविधांची कामे मार्गी लागली आहेत. आज आडाळीत बदललेलं चित्र हे महाविकास आघाडीच काम आहॆ. त्यामुळे सत्तेत असताना आम्ही काय केलं हे जनतेला विचारा, त्याच जनताच उत्तर देईल. भाजप केंद्रात गेली नऊ वर्षे सत्तेत आहॆ. आज केंद्रातील उद्योग खात भाजप कडे आहॆ. राज्यात उद्योगमंत्री तुमच्या मित्र पक्षाचे आहेत. दोघेही सिंधुदुर्ग मधील आहेत. शिवाय *दीपक केसरकरांच्या बोलण्यात कायम उद्योगाचा ध्यास असतो. एवढी ताकद असताना आडाळीत उद्योगांची स्पर्धा दिसायला हवी होती. पण प्रत्यक्षात त्यांच्या माध्यमातून एकही उद्योग आला नाही. केवळ मोठमोठी आश्वासन दिल्याने जनतेचा प्रश्न सुटत नाही. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही आडाळी बाबत आश्वासन दिले नाही. कारण जनतेच्या प्रश्नांवर काम करणारा आमचा प्रश्न आहॆ. खासदार सुप्रिया सुळे यांनी केवळ एक भाषण केलं तर तुम्ही एवढे बिथरलात. कारण त्यांचं भाषण हे जनतेच्या प्रश्नांना सोडविण्यासाठीची तळमळ काय असते ते दाखविणार होत. आम्ही आमच्या अजेंड्यावर उद्योग हा विषय घेतला आहॆ. वरिष्ठाच्या मार्गदर्शनखाली आम्ही कालबद्धपणे काम करणार आहोत. मोठ्या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्षातलं लहान काम हे जनतेला हवं असतं. कदाचित जनतेला दिलासा देण्यासाठी आम्हाला आपलं सहकार्य लागलं तरी ते देखील घ्यायला आम्हाला कमीपणा वाटणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ ही जनतेशी जोडलेली आहॆ. त्यामुळे नाहक टिका करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा. विकासाची स्पर्धा करा. जनतेला रोजगार हवा आहॆ, मनोरंजना साठी त्यांच्याकडे भरपूर साधन आहेत. याचं भान भाजपच्या नेत्यांनी ठेवावं. राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेच्या प्रश्नावर काम करणारा पक्ष आहॆ. त्यामुळे सत्तेत असतानाही काम केलं आणि विरोधात असतानाही कामच करतो. फसवी आश्वासन देत नाही. आयुष प्रकल्पाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आडाळीत भूखंड दिला. दोन वर्षे झाली तरी आपल्या मंत्र्यांना त्याचे भूमिपूजन करता आलं नाही, यावरून भाजप सरकारची सिंधुदुर्गातील बेरोजगार युवकाप्रती असलेली आस्था दिसून येणारी आहे असे ते यावेळी म्हणाले.

You cannot copy content of this page