सत्तेत असताना आडाळीचा प्रश्न कितीवेळा मांडला;एकनाथ नाडकर्णी यांचा अर्चना घारेंना सवाल…
⚡दोडामार्ग, ता.२८-: राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे यांनी सत्तेत असताना आडाळी एमआयडीसीचा प्रश्न किती वेळा मांडला? उद्योग खात्याचे राज्यमंत्रीपद असताना अदिती तटकरे यांनी काय प्रयत्न केले? असा सवाल भाजप नेते एकनाथ नाडकर्णी यांनी केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना आणून येथील लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयोग करू नये, जनतेला तुमचा दुटप्पीपणा माहिती आहे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. काल या ठिकाणी दाखल झालेल्या खासदार सुळे यांनी आडाळी एमआयडीसीवरून रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर नाडकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले.
