राज्यात सत्तेत असताना कोकणासाठी काय केले ते सुळे यांनी जाहीर करावे…

मंत्री चव्हाण आणि निलेश राणें यांच्यात वाद नाहीत:माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आरोपाला दिले उत्तर

⚡सावंतवाडी ता.२८-: राज्यात या आदी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना तुम्ही कोकणच्या जनतेला रोजगार देण्यासाठी किती प्रयत्न केला ते आधी जाहीर करा, असा सवाल भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सुप्रिया सुळे यांना केला आहे. दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण व निलेश राणें यांच्यात कोणतेही वाद नाही. परंतु मिडीयाच्या माध्यमातून ही चर्चा समोर आली. त्यामुळे मिडीयाने उगाच दिशाभूल करू नये, असेही तेली यावेळी बोलातान म्हणाले. ते आज सावंतवाडी भाजप विधानसभा संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

तेली पुढे म्हणाले की सुप्रिया सुळे जिल्ह्यात येऊन फक्त लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले. सी वल्ड सारख्या प्रकल्पाला कोणी विरोध केला त्याचे आपण आत्मपरिशन करावे. मग भाजपवर टिका करावी, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले दरम्यान आरोग्याच्या बाबतीत जिल्ह्याची अवस्था बेकार आहे. त्यामुळे आरोग्याचा बॅक लाॅग पूर्णपणे भरावा, अशी मागणी देखील तेली यांनी यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page