महेश सारंग; वाढदिवस उत्सवात साजरा..
⚡सावंतवाडी ता.२५-: भाजप पक्ष बळकट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनकल्याणाच्या योजना राबविल्या आहेत. त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत राहीन तसेच जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या कमळ चिन्हावर लढविल्या जाव्यात म्हणून पालकमंत्री रवींद्र चव्हाण व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची ग्वाही भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना दिली.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस , जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांना वाढदिवसाच्या निमित्ताने तळागाळातील लोकांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोची प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब,भाजपच्या महिला संघटक सौ. श्वेता कोरगावकर, तालुकाध्यक्ष महेश धुरी, जिल्हा बँक संचालक रवी मडगांवकर, भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती गुरूनाथ पेडणेकर, माजी बँक संचालक प्रमोद कामत,माजी सभापती सौ. प्रियांका गावडे, सैनिक पतसंस्था महाव्यवस्थापक सुनील राऊळ,माजी सभापती प्रमोद सावंत, संजय शिरसाट, दिलीप भालेकर, सांगेली सरपंच लवू भिंगारे, चंद्रकांत जाधव, तौकीर शेख, चंदन धुरी, साबाजी धुरी, प्रसन्न देसाई, माजगाव सरपंच सौ अर्चना सावंत,अजय सावंत, मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर, शिरशिंगे सरपंच दिपक राऊळ, मंदार कल्याणकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, भाजपचे राजू राऊळ, दोडामार्ग अध्यक्ष सुधीर दळवी, चंद्रकांत मळीक, माजी उपसभापती शितल राऊळ, दादू कविटकर, भाई राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
महेश सारंग म्हणाले, भारतीय जनता पार्टी मध्ये माझा प्रवास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. भाजप ने संघटनेत काम करण्याची संधी दिली. पुर्वी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले.पण भाजपामध्ये संघटनेचे काम मिळाले आणि संघटना बांधणीचा यशस्वी प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेसाठी अनेक योजना राबविल्या त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सर्व राजकीय पक्षांपेक्षा भाजप कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करता आला. राजकीय प्रसंग आले तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पक्षातील अनेकजण बरोबर आहेत. भाजपची संघटना बांधणीचा प्रयत्न करत आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माध्यमातून काम, विकास करू शकतो. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजप कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत.
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, भाजपचे संघटनेचे काम करताना महेश सारंग यांच्या मागे उभे राहणार आहोत. जिल्हा परिषद मतदार संघात कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवली तरी विजय होवू शकतो त्यामुळे दुसऱ्या तालुक्यात जायची गरज नाही. संजू परब विधानसभा मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर महेश सारंग सोबत असले पाहिजे
माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, महेश सारंग यांनी भाजपसाठी काम करताना मोठ्या मनाचा कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केली.
सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे म्हणाले, राजकारणापलीकडची दोस्ती निभावणारा महेश सारंग आहे. भाजपचे मंदार कल्याणकर म्हणाले, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महेश सारंग ला भाजपमध्ये प्रवेश दिला आणि भाजपने ग्रामपंचायतीत विजयाची घौडदौड सुरू झाली.
यावेळी युवराज लखमराजे भोसले,सरपंच संतोष राऊळ , माजी सरपंच चंदन धुरी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, अशोक माळकर, महिला संघटक सौ श्वेता कोरगावकर, सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा बँक माजी संचालक प्रमोद कामत यांनीही महेश सारंग यांच्या कामाबद्दल विचार मांडले आणि शुभेच्छा दिल्या.
