नगरसेविका श्रेया गवंडे यांच्याकडून सलग दुसऱ्या वर्षी आयोजन
⚡कुडाळ ता.२५-: कुडाळच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका श्रेया गवंडे यांनी सलग दुसऱ्या वर्षी खेळ पैठणीच्या या स्पर्धेचे आयोजन केले होते. नगरसेविका श्रेया गवंडे यांच्या हस्ते प्रसिद्ध निवेदक बादल चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ३१ महिलांनी भाग घेतला.
ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बादल चौधरी यांनी उत्तम निवेदक करून वेगवेगळ्या खेळांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आर्या राजाराम तोरस्कर, द्वितीय प्रणाली सूरज गवंडे यांनी पटकवला. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. तनपुरे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी त्यांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला साईकला मित्रमंडळाच्या सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांचे सर्वांचे नगरसेविका श्रेया गवंडे यांनी आभार मानले.
नाबरवाडीतील महिलांना रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ आपल्यासाठी तणावमुक्त होण्यासाठी कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्व महिला वर्गातून समाधान तसेच नगरसेविका श्रेया गवंडे यांचे आभार व्यक्त केले.
