परब मराठा कार्यालय उद्घाटन प्रसंगी जी एस परब यांचे आवाहन..
मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणाला व त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे आपण गावचे मानकरी असलो तरी विखुरलेले आहोत.”आपले विचार बदला व सर्वांना सोबत घेऊन चला”तरच आपला समाज एकत्र येईल ही आपली भावना पाहिजे.एकत्र जमा समाज मोठा करूया. आपण संकल्पना करूया असे आवाहन जी एस परब यांनी परब मराठा ज्ञाती बांधव मंडळांच्या सिंधुदुर्गनगरी येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
परब मराठा समाज मुंबई- सिंधुदुर्ग जिल्हा संलग्न कार्यालयाचे विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गनगरी रवळनाथ मंदिर समोरील पद्माकर परब यांच्या घरी कार्यालयाचे फीत कापून मुंबईचे संस्था अध्यक्ष जी एस परब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कै.परब गुरुजी. यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी मुंबई संस्था अध्यक्ष जी एस परब, सिंधुदुर्ग संघटक अध्यक्ष विनायक परब, बाळकृष्ण परब, महादेव परब,परशुराम परब, राजन परब, सुहास परब, महादेव परब, शुभम परब ,सुशील परब, मारुती परब ,पद्माकर परब, विनोद परब, आदींसह सिंधुदुर्ग- मुंबई येथील परब बांधव,तसेच महिला भगिनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
