परशुराम उपरकर; बांधकाम अधिकाऱ्यांनी घेतला दीड महिन्याचा अवधी..
⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी तालुक्यातील प्रमुख रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांच्या दुरावस्थेबाबत मनसेने पुकारलेले येत्या 30 आक्टोबरं रोजी डब्बे वाजवा आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आले आहे याबाबतची माहिती मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येत्या दीड महिन्यात आपण तालुक्यातील सर्व रस्ते पूर्ण करण्याची आश्वासन यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याने हे आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आल्याचे उपरकर यांनी यावेळी सांगितले.तसचे येथा दीड महिन्यात रस्त्याची पूर्तता पूर्ण न केल्यास पुन्हा डब्बे वाजवा आंदोलन पुन्हा करण्यात येईल असे उपरकर यावेळी म्हणाले सावंतवाडी पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार,मंदार नाईक,सुरेंद्र कोठावळे,स्वप्निल कोठावळे
विजय जांभळे,नंदू परब,स्वप्निल जाधव,गीरगोल दिया,मनोज कांबळी निलेश देसाई,आबा चिपकर,प्रवीण गवस,प्रकाश साटेलकर,प्रणित तळकर,मयूर पालकर आदी उपस्थित होते.
