प्रवीण भोसले: भवितव्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू..
⚡सावंतवाडी ता.२५-: भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणें यांनी घेतलेला राजकीय संन्यास हा स्टंट नसून त्यांची समजूत केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी काढावी अस मत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व्यक्त केले तर त्यांनी आपल्या राजकीय भवितव्यासाठी राष्ट्रवादीत यावे तसेच शरद पवार यांनी निलेश राणें यांना आशिर्वाद देऊन पक्षात घेतले तर आम्ही देखील त्याचं स्वागत करू असे श्री.प्रवीण भोसले यावेळी बोलताना म्हणाले.ते सावंतवाडीत राष्ट्रवादी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
