माजी खासदार निलेश राणे यांनी राजकीय निवृत्ती मागे घ्यावी…

मंगेश तळवणेकर यांची मागणी:निर्णय बदलण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार.

⚡सावंतवाडी ता.२४-: निलेश राणे यांनी केलेली राजकीय निवृत्तीची घोषणा त्यांनी त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी माजी शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केली आहे. निलेश राणे यांच्या सारखे दानशूर व्यक्तिमत्व असलेल्यांनी एवढ्या कमी वयात राजकारणात निवृत्ती घेणे हे चुकीचं असून त्यांनी त्वरित आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी तळवणेकर पुढे बोलताना म्हणाले की निलेश राणे यांच्या सारखे खंबीर नेतृत्व सिंधुदुर्ग च्या युवा नेतृत्वांना हवे आहे, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा घेतलेला निर्णय अत्यंत वेदनादायी आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीच्या पद्धतीचा असून त्यांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान आज आपण अनेकांना समाजात मदत करत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे नेतृत्व जर आज आपल्यापासून जर दूरावत असेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा. तसेच आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page