सिंधुदुर्गच्या राजकारणातील कणखर नेतृत्व…

भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…!!!

⚡सावंतवाडी ता.२४’-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्व गुणातून आणि संघटनात्मक कौशल्यातून एक विशिष्ट स्थान निर्माण करणारे तडफदार कणखर नेतृत्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग होय. आज त्यांचा वाढदिवस. या निमित्ताने ग्लोबल महाराष्ट्र’कडून त्याच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा ..
महेश सारंग यांना राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले. सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती कै.वृंदा सारंग या त्यांच्या मातोश्री. वृंदा सारंग यांनी शिवसेनेच्या तिकिटावर कोलगांव पंचायत समिती प्रभागाची निवडणूक लढवली व त्या निवडूनही आल्या. यावेळी महेश नुकताच राजकारणात सक्रिय होत होता. कोलगावच्या शिवसेना शाखेचा उपशाखाप्रमुख म्हणून त्याच्याकडे जबाबदारी होती. त्यानंतर त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवली व सरपंच पदाची माळ त्याच्या गळ्यात पडली.
याच दरम्यान त्याची आई वृंदा सारंग यांना पंचायत समितीच्या सभापतीपदाचा बहुमान मिळाला. आईच्या पदाच्या माध्यमातून महेश सारंग यांनी आपल्या कोलगांव गावासह मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला.
त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना पूढील निवडणूकीत कारिवडे पंचायत समिती प्रभागाची उमेदवारी देण्यात आली. तर याच वेळी त्यांच्या आई वृंदा सारंग यांना कोलगांव जिल्हा परिषद मतदारसंघाची उमेदवारी दिली. एकाच वेळी दोन्ही निवडणूकांची तसेच कोलगांव पंचायत समितीची ही जबाबदारी असताना देखील महेश सारंग यांनी या तिन्ही जागांवर विजय मिळवित निर्विवाद वर्चस्वयश प्राप्त केले.
दरम्यानच्या काळात महेश सारंग यांच्याकडे पक्षाने उपसभापती पदाचा कार्यभार सोपविला.
मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमध्ये असताना झालेल्या राजकीय घडामोडीनंतर त्यांनी भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी तालुक्यात भाजप पक्ष अगदीच नगण्य होता. याच वेळी पक्ष नेतत्वाने त्यांच्यावर अखंड सावंतवाडी तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. याच वेळी त्यांच्या संघटन कौशल्याचा खऱ्या अर्थाने कस लागला. समोर काँग्रेसचे तगडे आव्हान असूनही त्यांनी गावांगावात जाऊन पक्ष संघटन मजबूत केले. अनेक गावांत बूथ कमिटी स्थापन करून पक्षाची मुहर्तमेढ रोवली व संघटना बांधली. भाजपकडे त्या काळात केवळ बांदा ही एकमेव ग्रामपंचायत असताना त्यावेळी झालेल्या निवडणूकीत सावंतवाडी तालुक्यात तब्बल २४ ग्रामपंचायती निवडून आणून २४ सरपंच तर २७ ग्रामपंचायतवर उपसरपंच बसवले. अलिकडेच झालेल्या निवडणूकीत कोलगाव ग्रामपंचायतवर महेश सारंग यांच्या नेतत्वात निर्विवाद यश प्राप्त केले. त्यांचे बंधू दिनेश हे विद्यमान उपसरपंच असून ते देखील कोलगावच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत.
पुढे २०१९ साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपवासी झाल्यानंतर पूढे झालेल्या विधानसभा निवडणूकीत सावंतवाडी तालुक्यातून भाजपला ३१ हजार मते मिळवून दिली. केवळ ३ वर्षांच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटनात्मक पातळीवर काम करीत भाजपचे कमळ घरोघरी पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. यानंतर भाजपच्या नवीन जिल्हा कार्यकारणीत त्यांचा सहभाग झाला. राजन तेली जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याकडे जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी जिल्ह्याच्या पातळीवर काम करताना जिल्ह्यातील ९१६ बुथवर संपूर्ण बुथरचना करून वरिष्ठांची वाहवा मिळविली. त्यांच्या या कार्याची प्रदेश भाजपनेही दखल घेत त्यांचे कौतुक केले.संघटनात्मक कामाला २४ तास वाहून घेत महेश सारंग यांनी भारतीय जनता पार्टी गावागावात व शेवटच्या बूथ पर्यंत नेण्याचे काम केले. सद्या भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदाची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली असून ते या पदाला न्याय देण्याचे काम करत आहेत.

You cannot copy content of this page