⚡मालवण ता.२३-: मालवण एसटी स्टॅन्ड नजीकच्या गजानन महाराज बालगोपाळ मित्र मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मोठ्या गटात नागेश मालवणकर व छोट्या गटात साईल तोडणकर याने प्रथम क्रमांक तसेच सारी डे स्पर्धेत वैभवी खानोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
फॅन्सी ड्रेस व सारी डे स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फॅन्सी ड्रेस स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यात मोठ्या गटात द्वितीय क्रमांक नागेश कांदळकर, तृतीय क्रमांक अमृता म्हापणकर यांनी मिळविला. तर लहान गटात द्वितीय क्रमांक नवेली मेस्त्री, तृतीय क्रमांक तन्मयी चव्हाण याने मिळविला. तसेच सारी डे स्पर्धेत द्वितीय क्रमांक संजना मंडलिक, तृतीय क्रमांक गिरिजा वरलेकर यांनी मिळविला. विजेत्या स्पर्धकांना श्री. प्रभाकर देऊलकर आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
