विद्यार्थी हक्क कृती समितीच्या जिल्हा प्रवक्ते पदी दिक्षा लुडबे यांची निवड…

⚡मालवण ता.२३-: विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा व तालुका कार्यकारिणीची प्रथम बैठक ओरोस येथे संपन्न होऊन या बैठकीत जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेच्या जिल्हा प्रवक्तेपदी व मालवण तालुकाध्यक्ष पदी दिक्षा लुडबे यांची तसेच जिल्हा उपाध्यक्ष पदी सानिका पाताडे, जिल्हा संपर्कप्रमुख पदी लंकेश जांभळे यांची निवड करण्यात आली.

विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्य हि संस्था छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी व विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, सांस्कृतिक गोष्टी व कौशल्य यांचा विकास करण्यासाठी व त्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्थापन केलेली आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेतन अरविंद पाटील व संस्थापक सचिव रामराजे तानाजीराव काळे हे आहेत. या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हा व तालुका कार्यकारणीची प्रथम बैठक ओरोस येथे पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी कशाप्रकारे काम करता येईल यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मातृत्व आधार फाउंडेशन या संस्थेचे संचालक हरिश्चंद्र उर्फ दादा वेंगुर्लेकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी समिती मध्ये सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी विविध पदावर नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. उर्वरित नियुक्त्या पुढीलप्रमाणे – मालवण तालुका संपर्कप्रमुख – पूर्वा वेंगुर्लेकर, मालवण तालुका सहसंपर्कप्रमुख- गौरव कांदळगावकर, कुडाळ तालुका अध्यक्ष – सेजल जाधव, सावंतवाडी तालुका अध्यक्ष- सिद्धी लाड, सावंतवाडी तालुका कार्याध्यक्ष- दिया मालवणकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष- जय मांजरेकर.

भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत, याची माहिती संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष हार्दिक सचिन कदम यांच्या वतीने देण्यात आली.

You cannot copy content of this page