⚡मालवण ता.२३-:
मसुरे गडगघेरावाडी येथील रहिवासी आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले महाराष्ट्र पोलीस दलातील राष्ट्रपती पदक विजेते पोलीस दलाची शान असलेले निवृत्त पोलीस अधिकारी विजय शंकर दूखंडे (वय 78) यांचे नुकतेच ठाणे येथे निधन झाले. मुंबई पोलीस दलामध्ये मास्टर या टोपण नावाने त्यांची ओळख होती.विजय दुखंडे यांच्या निधनामुळे मसुरे गावावर शोककळा पसरली आहे.
मसुरे येथील विजय दुखंडे यांनी गावात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही दिवस पान विक्रीचा व्यवसाय केला होता. अतिशय खडतर परिस्थितीत बोटीने त्यांनी मुंबई गाठून काही वर्ष मील मध्ये सुद्धा नोकरी केली होती. यानंतर त्यांनी पोलीस दलात नोकरी करताना पोलीस दलाचे, महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. अनेक गुन्ह्यांचा त्यांनी छडा देशभर फिरून लावला होता.
त्यांच्या पश्चात एक मुलगा सून दोन मुली जावई नातवंडे पुतणे पुतणी असा मोठा परिवार आहे
