भाजपने किल्ले सिंधुदुर्गवर साजरा केला मिरी मिट्टी मेरा देश उपक्रम…

युवा मोर्चाचे आयोजन:तालुकाध्यक्ष यांनी संदीप मेस्त्री यांच्याकडे सादर केले कलश

⚡मालवण ता.२३-: स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभर साजरे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातीला अभिवादन, वीरांना नमन म्हणून मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान देशभर हाती घेतले आहे. सिंधुदुर्ग युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर मेरी मिट्टी मेरा देश उप्रकम राबवण्यात आला. जिल्ह्यातील युवा मोर्चाच्या सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी माती कलश सिंधुदुर्ग किल्यावर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांच्याकडे सुपूर्द केला.

दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चा देखील सेल्फी विथ मिट्टी अभियान देशभर राबवत आहे. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या सेल्फी विथ मिट्टी उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा विक्रमी नोंद करणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांनी म्हटले आहे. दूरदृष्टी असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी जवान व माती यांच्या प्रती आदर व वीरांच्या समर्पण भावनेला सलाम म्हणून आपण देखील वीरांच्या प्रती आदराची भावना कायम राखावी म्हणून हे अभियान देशभर राबवत असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्यभर विक्रमी सेल्फी विथ मिट्टी अभियान भारतीय जनता युवा मोर्चा राबवत असून प्रत्येक जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून माती कलश तालुकाध्यक्षांमार्फत जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केला जात आहे. हा कलश राज्य पातळीवरून देशपातळीवर पोहोचवला जाणार आहे.यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, सरचिटणीस संतोष पुजारे, मालवण तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, प्रसाद पाटकर, प्रणव वायंगणकर, सोशल मीडियाचे समीर प्रभुगावकर, गौरव घाडीगावकर, सर्वेश दळवी, नारायण कुंभार, संदिप बांदेकर, जयेश चींचोळकर, सुमित सावंत, मंदार पडवळ, राकेश सावंत, गौरव लुडबे, निषय पालेकर, संजय नाईक, सिद्धेश कांबळी, साई सावंत, बाबू राणे, शुभम लुडबे, सुशील गावडे, सुरज भगत, राज कांदळकर, निनाद बादेकर, राहुल हरचकर, पराग परब, रोहित जोशी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page