काव्या चव्हाण, पार्थ पावसकर यांचे यश…

रांगभरण व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर..

बांदा/प्रतिनिधी
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळ बांदा यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण व चित्रकला स्पर्धेत काव्या सूर्यकांत चव्हाण व पार्थ दत्तप्रसाद पावसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रोटरॅक्टचे अध्यक्ष अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, निहाल गवंडे, ईश्वरी कल्याणकर, नवरात्र उत्सव मंडळचे अध्यक्ष राकेश केसरकर, खजिनदार ओंकार नाडकर्णी, राजेश विर्नोडकर, युवराज वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नेहमी अश्या स्पर्धा रोटरॅक्ट क्लब आयोजित करत असतो असे यावेळी अध्यक्ष मयेकर यांनी सांगितले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे रंगभरण स्पर्धा –
प्रथम- काव्या सूर्यकांत चव्हाण, द्वितीय- समर्थ सागर पाटील, तृतीय- सायली शेखर बांदेकर.
चित्रकला स्पर्धा- प्रथम- पार्थ दत्तप्रसाद पावसकर, द्वितीय- चिन्मयी सूर्यकांत चव्हाण, तृतीय- मीत राजेश विर्नोडकर. स्पर्धेचे परीक्षण केदार कणबर्गी यांनी केले.
फोटो :-
बांदा येथे आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page