रक्तदान शिबिरात ३५ दात्यांचे रक्तदान…

सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त करण्यात आले होते आयोजन..

⚡वेंगुर्ले ता.२३-: रोजारी युथ ग्रुप व उभादांडा मित्र मंडळ व कार्मिस आल्मेडा यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १७ वर्ष सर्वांच्या सहकार्याने उभादांडा शाळा नं २ येथे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात १८ या भव्य रक्तदान शिबीरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान तर मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा सुमारे ३०० रुग्णांनी लाभ घेतला.

या रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनने जिल्ला समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते दिपप्रज्यवनाने झाले या प्रसंगी उपस्थित मान्यवरात शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हा संघटक सुनील मोरजकर, सुनिल डुबळे, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, पोलीस पाटील विजय नार्वेकर उभादांडा मित्रमंडळाने अध्यक्ष संदेश मोघे, कार्मिस आल्मेडा, उभादांडा ग्रामपंचायत उपसरपंच सौ. कालेस्तीन आलमेडा ग्रामपंचायत सदस्य निरंजन साळगावकर, देवदत्त जुवलेकर, रोशन ब्रिटो, डॉ. दिगंबर करंबळेकर, डॉ. सुप्रिया राऊळ, तसेच जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गची टीम व रक्त संकलनांसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची टीम कार्यरत आदी मान्यवरांचा समावेश होता.
गेली १७ वर्ष रोजारी युथ ग्रुप व उमादांडा मित्र मंडळमार्फत गोरगरीब लोकांना, रक्तदात्यांच्या सहकार्याने आजपर्यंत रक्तदान है सर्वश्रेष्ठ दान समजून हजारो लोकांना गरजेनुसार मोफत रक्त पुरवठा केला आहे. या १८ व्या रक्तदान शिबीरांतही रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच याच उभादांडा शाळा नं. २ येथे ३० महिलांची आरोग्य तपासणी, ० ते १८ वयोगटातील ४३ मुलांची तपासणी, १८ वर्षावरील ७१ पुरुषांनी, ४८ जणांची रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, कान, नाक, घसा तपासणी मोफत करण्यात आली. एन.ए.टी.व्ही.एम.चा ७१ जणांनी लाभ घेतला. तसेच आयुष्यमान भारतची नोंदणी १९ व PMJAY कार्डच्या नोंदणीचा ४२ जणांनी लाभ घेतला. तसेच आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जणांनी मोफत नोंदणी करून घेतली.
सदर रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीतेसाठी उभादांड मित्र मंडळ व शिवसेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page