विशाल परब यांचे सावंतवाडीत जंगी स्वागत…

विशाल परब तुम आगे बढो दिल्या घोषणा:जोरदार शक्तिप्रदर्शन..

सावंतवाडी
भाजपा युवा नेते विशाल परब यांची महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर आज उशिरा सावंतवाडीत दाखल झालेल्या श्री परब यांचे भाजपा पदाधिकारी हितचिंतक यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जल्लोषात स्वागत केले. विशाल परब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आल्या.
श्री परब यांची आज महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी कोल्हापुर येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र देत राज्यात युवामोर्चाची ताकद वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. एकुणच त्याच्या या निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. विविध स्तरातून श्री परब यांच्यावर वर्षाव होत असतांना रात्री उशिरा ते सावंतवाडीत होताच सावंतवाडी भाजपाकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page