⚡मालवण ता.२२-: मालवण धुरीवाडा येथे नवरात्रौत्सवानिमित्त शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वेशभूषा स्पर्धेत विविध गटात रामेश्वर गावकर, रेवा जोशी, शांती तोंडवळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिल्पा खोत मित्रमंडळाच्या वतीने काल रात्री ३ ते ६ वर्षे, ७ ते १० वर्षे, ३१ वर्षे पुढे अशा तीन गटात वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या गटात रिधीमा शिंदे द्वितीय, अर्पिता मुणगेकर तृतीय क्रमांक मिळविला. दुसऱ्या गटात मृदुला राऊळ द्वितीय, चार्वी राऊळ तृतीय क्रमांक मिळविला. तिसऱ्या गटात प्रियांका लाड द्वितीय, अश्विनी आचरेकर तृतीय, ज्योती तोडणकर उत्तेजनार्थ, रजनी चव्हाण यांनी क्रमांक मिळविला. विविध गटातील स्पर्धकांनी आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या.
विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिल्पा खोत, माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह अन्य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
