शैलेश परब:स्वार्थासाठी संधीसाधूना शिवसैनिक आणि जनता येणाऱ्या निवडणुकीत योग्य ती जागा दाखवेल…
आंबोली,ता.21: राष्ट्रवादीचे कारण सांगून गेलेल्या मिंदे गटाच्या आमदारांना अजित पवार सत्तेत आल्यानंतर सांगण्यासारखे काहीही उरले नाही.स्वार्थासाठी गेलेल्याना जनता ओळखून आहे. गेल्या १४ वर्षात ज्यांना फारसे काही करता आले नाही इथले प्रश्न सोडवायला जमले नाही त्यांना नेहमी आपण सत्तेत आणि खुर्चीत राहण्यासाठी कोटीच्या कोटी आकडेवारीची धूळफेक आणि पोकळ आश्वासाने देऊन पुन्हा स्वप्ने दिसत आहेत. मात्र इथले शिवसैनिक योग्य ती जागा दाखवून देतील आणि पुन्हा एकदा पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करतील असे प्रतिपादन सावंतवाडी मतदारसंघाचे भावी आमदार तथा जिल्हासंपर्क प्रमुख शैलेश परब यांनी आंबोलीत केले. आंबोली नांगरतास येथे दसरा सणानिमित्त धनगर बांधवांच्या नांगरतासवाडी येथे शिवसेनेचे श्री शैलेश परब यांनी भेट दिली.
यावेळी उपतालुका प्रमुख राजू शेटकर, प्रशांत बुगडे,हिमांशू परब,विभागप्रमुख बबन गावडे, संतोष उर्फ बुधाजी पाताडे,काशीराम राऊत,डुबाजी राऊत,दाजी गुरव,अनिल चव्हाण,कांता गुरव,केशव जाधव,लक्ष्मण पटकारे,नाऊ पटकारे,केदु शेळके,सुभाष यमकर, देऊ यमकर,विठ्ठल गावडे, तानाजी गावडे,लक्ष्मण गावडे आदी उपस्थित होते.यावेळी संतोष पाताडे यांनी निवेदन केले.यानंतर विधानसभेचे भावी आमदार तथा संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी इथल्या ग्रामस्थांचे प्रश्न समजून मनोगत व्यक्त केले. दसरा सणानिमित्त येथे गज नृत्य तसेच मोठा उत्सव धनगर समाज या ठिकाणी साजरा करत असतो त्यानिमित्त त्यांनी भेट दिली.शिवतीर्थावर विचारांचे सोने शिवसेनेची सभा असल्याने त्यांनी नवरात्रीत भेट दिली. या ठिकाणचे रस्ते,जमीन प्रश्न, उद्योग तरुणाच्या महिलांच्या हाताला कामे देऊ,आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंबोली पर्यटन स्थळ करू अशी अनेक खोटी आश्वासने आणि कोट्यांच्या आकडेवारीने इथल्या लोकांना काहीही मिळाले नाही. स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी इथल्या लोकांचा वापर करून आपले इच्छित साधणार्यांना शिवसैनिक योग्य ती जागा येणाऱ्या निवडणुकीत दाखवतील आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठीशी खंभीर पणे उभे राहून उद्धव ठाकरे यांचें हात बळकट करून समृद्धी आनुया असे प्रतिपादन शैलेश परब यांनी आंबोली नांगरतास येथे केले. यावेळी नांगरतास येथे खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून ५ लाख रुपयांच्या सभा मंडपाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला. यानंतर माऊली मंदिर येथे दर्शन,प्रकाश गुरव यांच्याघरी गावठण वाडी माऊली दर्शन,राम मंदिर येथील श्रीराम कला क्रीडा मंडळाच्या दुर्गा देवीला भेट दिली.
